रशियन नागरिकांना मिळणार ३० दिवसांचा मोफत व्हिसा - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बैठकीनंतर हैदराबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचे मोफत ई-टुरिस्ट
रशियन नागरिकांना मिळणार ३० दिवसांचा मोफत व्हिसा- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बैठकीनंतर हैदराबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचे मोफत ई-टुरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचे ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू केले जातील. दोन्ही नेत्यांनी २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य वाढवणे आणि व्यापार–गुंतवणूक मजबूत करणे यावर सहमती दर्शवली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि रशिया यांच्यात नेहमीच आपुलकी आणि आत्म-सन्मानाचे नाते राहिले आहे. अलीकडेच रशियात भारताचे दोन नवीन वाणिज्य दूतावास सुरू झाले आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संपर्क अधिक सोयीस्कर होईल आणि परस्परांची जवळीकही वाढेल. लवकरच आम्ही रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचे नि:शुल्क ई-टुरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचे ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करणार आहोत. आम्ही एकत्रितपणे व्यावसायिक शिक्षण, स्किलिंग आणि प्रशिक्षणावरही काम करू. दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ आणि खेळाडू यांचा आदान-प्रदान वाढेल.

मोदी म्हणाले, भारत–रशियाची मैत्री ध्रुवताऱ्यासारखी स्थिर राहिली आहे. आम्ही काळाच्या कसोटीवर नेहमी खरे उतरलो आहोत. आज आम्ही या भक्कम पायावर सहकार्याच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर आम्ही सहमती दर्शवली आहे. यामुळे व्यापार आणि गुंतवणूक संतुलित व टिकाऊ स्वरूपात वाढेल आणि सहकार्याची नवी क्षितिजे उघडतील. भारत–रशिया ट्रेडिंग फोरममध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल, ज्यामुळे आमचे व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील. निर्यात, सह-निर्मिती आणि सह-नवोन्मेष यासाठीही नवीन दारे उघडतील.

ते पुढे म्हणाले, आपले सहकार्य अन्नसुरक्षा आणि शेतकरी कल्याणासाठीही महत्त्वाचे आहे. दोन्ही देश एकत्रितपणे युरिया उत्पादनावर काम करत आहेत. भारत–रशिया यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवणे हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे. ऊर्जा सुरक्षा ही भारत–रशिया भागीदारीची एक मजबूत आणि महत्त्वाची कडी राहिली आहे, आणि आम्ही या ‘विन-विन’ सहकार्याला पुढेही चालू ठेवू. महत्त्वाच्या खनिजांवरील सहकार्यही तितकेच आवश्यक असून स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रात आपली भागीदारी आणखी बळकट होईल.

मोदी म्हणाले की युक्रेन विषयक मुद्द्यावर भारताने नेहमी शांततेचेच समर्थन केले आहे. या समस्येच्या कायमस्वरूपी समाधानासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. भारत आपले योगदान देण्यासाठी नेहमी तयार आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत भारत आणि रशिया नेहमी खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत. भारताचा ठाम विश्वास आहे की दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट प्रहार आहे आणि त्याविरुद्ध जागतिक एकता हेच आपले सर्वात मोठे बळ आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande