इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइट रद्दच्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेटने सुरू केली २९ नवीन उड्डाणे
नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।इंडिगो एअरलाईन्सच्या मोठ्या प्रमाणावरील फ्लाइट रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेटने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी स्पाइसजेटने अचानक दिल्ली आणि मुंबई येथून एकूण २९ अतिरिक्
इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइट रद्दीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेटने सुरू केली २९ नवीन उड्डाणे


नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।इंडिगो एअरलाईन्सच्या मोठ्या प्रमाणावरील फ्लाइट रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर स्पाइसजेटने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी स्पाइसजेटने अचानक दिल्ली आणि मुंबई येथून एकूण २९ अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली. यात बहुतेक देशांतर्गत मार्गांसोबत दुबई आणि बँकॉकसारखी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय ठिकाणेही समाविष्ट आहेत.

एअरलाईनने सर्व नवीन फ्लाइट्सची संपूर्ण यादी—फ्लाइट क्रमांक, गंतव्य आणि वेळेसह—आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केली आहे. प्रवाशांना बुकिंग करण्यापूर्वी नवीनतम शेड्यूल तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

स्पाइसजेटची नवी उड्डाणे : मुंबईहून – १४ नवीन फ्लाइट्स, दिल्लीहून – १५ नवीन फ्लाइट्स तर विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे (आजपासून सुरू) मुंबई - दुबई :रात्री 10:55 वाजता,दिल्ली - दुबई: सायंकाळी 7:20 वाजता,दिल्ली - बँकॉक: रात्री 9:05 वाजता

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या हजारो प्रवाशांना फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्पाइसजेटचे हे पाऊल प्रवाशांसाठी तर दिलासादायक ठरतेच, शिवाय बाजारातील आपला वाटा वाढवण्यासाठीचा एक स्मार्ट निर्णय म्हणूनही पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande