
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या भेटीनंतर रुग्णालय परिसरात चिंता आणि अपेक्षेचे वातावरण दिसून आले.
बाबा आढाव यांच्या कुटुंबीयांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीलाच विश्वास ठेवावा आणि सर्व घडामोडी वेळोवेळी कळविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule