
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)।‘बिग बॉस 19’चा सीझन आता संपला आहे आणि सोबतच विजेत्याची घोषणा देखील झाली आहे. या सीझनचे विजेते गौरव खन्ना ठरले आहेत. फरहाना भट्टरला मागे टाकत गौरव खन्नाने शोची चमचमणारी ट्रॉफी जिंकली.
‘बिग बॉस 19’च्या फिनालेमध्ये सलमान खानने विजेता म्हणून गौरव खन्नाच्या नावाची घोषणा केली. शोच्या सुरुवातीपासूनच गौरव खन्ना हे एक मजबूत दावेदार मानले जात होते. त्यांनी टास्क जिंकत ‘टिकिट टू फिनाले’ मिळवले होते. त्यामुळे टॉप 5 मध्ये त्यांची जागा आधीच निश्चित झाली होती. नंतर ते टॉप 2 मध्ये पोहोचले, जिथे त्यांचा सामना फरहाना भट्टरशी झाला. त्यानंतर विजेता म्हणून त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली. गौरवला ट्रॉफीसोबत 50 लाख रुपयांचे बक्षीस देखील मिळाले.
गौरव खन्ना यांचा जन्म 11 डिसेंबर 1981 रोजी कानपूर येथे झाला. गौरव हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करतात. ‘अनुपमा’ या मालिकेत त्यांनी अनुज कपाडियाची भूमिका साकारल्यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. या भूमिकेसाठी त्यांना मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता असा इंडियन टेली अवॉर्डही मिळाला आहे. याशिवाय गौरवने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया सीझन 1’ देखील जिंकला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode