मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। बॉलीवूडचा चर्चेत असलेला चित्रपट ‘दोस्ताना 2’ अखेर नव्या दमदार स्टारकास्टसोबत पुन्हा सुरू झाला आहे. सुरुवातीला या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत होते, मात्र प्रोजेक्ट थांबल्यानंतर आता यात नवा ट्विस्ट आला आहे .
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विक्रांत मेसी याने स्वतः ‘दोस्ताना 2’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले आहे. हा त्याचा करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनसोबतचा पहिला प्रोजेक्ट आहे.
विक्रांतसोबत या चित्रपटात लक्ष्य लालवानीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांतच्या लुकबद्दल बोलायचं झालं, तर तो स्टायलिश डिझायनर कपडे आणि क्लासी चष्म्यात प्रेक्षकांना दिसेल. विक्रांत म्हणाला, “करण सर माझ्या लुकबाबत खूप काळजी घेत आहेत. प्रेक्षकांना माझा एकदम नवा अवतार पाहायला मिळणार आहे.”
या चित्रपटाचे शूटिंग सध्या युरोपमध्ये जोरात सुरू आहे. मात्र, मुख्य अभिनेत्रीचं नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आलं आहे आणि त्याची घोषणा करण जोहर स्वतः करतील.
नवा स्टारकास्ट, नवा अंदाज आणि करण जोहरची खास स्टाईल – ‘दोस्ताना 2’ पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये खळबळ उडवण्यासाठी सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर