नवी दिल्ली , 26 सप्टेंबर (हिं.स.)। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाटोचे महासचिव मार्क रूटे यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर संवाद झाला आहे.परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्टपणे सांगितले की, हा दावा वस्तुनिष्ठदृष्ट्या चुकीचा असून पूर्णपणे निराधार आहे.
नाटो महासचिव मार्क रूटे यांनी दावा केला होता की,पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी युक्रेनवरील त्यांच्या योजनेबद्दल चर्चा केली होती.अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाकडून तेल आयात केल्यामुळे भारतावर दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता.याच्या पार्श्वभूमीवर, मोदींनी पुतीन यांना युक्रेनमधील रणनीती समजावून सांगण्यास सांगितले, असे रूटे यांनी म्हटले होते.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे विधान ‘पूर्णपणे निराधार’ असल्याचे सांगून त्याचा निषेध केला आहे.मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतीन यांच्याशी कधीही अशा प्रकारे संवाद साधलेला नाही, जसा दावा मार्क रूटे यांनी केला आहे.मंत्रालयाने पुढे म्हटले की, “नाटोसारख्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नेतृत्वाकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी सार्वजनिक निवेदन करताना अधिक जबाबदारी आणि अचूकता दाखवावी.”
परराष्ट्र मंत्रालयाने भारताची उर्जा संबंधी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली की, भारताचे ऊर्जा आयातविषयक निर्णय राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने घेतले जातात.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधी जायसवाल यांनी सांगितले की,“जसे की यापूर्वीही स्पष्ट केले आहे, भारताचे उर्जा आयातीचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय ग्राहकांना स्थिर आणि परवडणाऱ्या दरात उर्जा उपलब्ध करून देणे आहे.” ते पुढे म्हणाले की,“भारत आपल्या राष्ट्रीय हितसंपत्ती आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाय करत राहील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode