'सन मराठी'वर २९ सप्टेंबरपासून सुरु होणार 'इन्स्पेक्टर मंजूचा' नवा प्रवास
मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘सन मराठी’वरील मंजूला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. येत्या २९ सप्टेंबरपासून ''कॉन्स्टेबल मंजू''चा ''इन्स्पेक्टर मंजू'' म्हणून नवा प्रवास दररोज रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.
'सन मराठी'वर २९ सप्टेंबरपासून सुरु होणार 'इन्स्पेक्टर मंजूचा' नवा प्रवास


मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘सन मराठी’वरील मंजूला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. येत्या २९ सप्टेंबरपासून 'कॉन्स्टेबल मंजू'चा 'इन्स्पेक्टर मंजू' म्हणून नवा प्रवास दररोज रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं सत्या- मंजूबरोबर इतकं घट्ट नातं निर्माण झालं आहे की, वयाच्या ८४ व्या वर्षी दत्ता कर्णे हे आजोबा मंजूला पाहण्यासाठी थेट सेटवर पोहोचले. प्रेक्षक सत्या- मंजूला कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतून सत्या- मंजूचा नवा प्रवास उलगडणार असून नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिक उंचीवर नेत आहे. प्रोमोमध्ये मंजू इन्स्पेक्टर च्या रूपात एंट्री घेताना दिसत आहे. तिचा हा डॅशिंग लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. याचसह सत्याचा लूक पूर्णपणे बदलेला दिसून येतोय. या मधल्या काळात सत्या - मंजूच्या नात्यात नक्की काय काय घडलं असेल? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी मंजूचा नवा प्रवास आणखी रंगतदार आणि मनोरंजक असणार आहे.

मालिकेच्या नव्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांची लाडकी मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, मंजू या नावाने मला प्रेक्षकांनी दिलेली ओळख ही माझ्यासाठी खूप आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. कॉन्स्टेबल मंजू ही भूमिका आजही प्रेक्षकांना खरी वाटते. आता या व्यक्तिरेखेचा नवा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. कॉन्स्टेबलची जबाबदारी पार पडल्यानंतर मंजू आता पुढील प्रशिक्षण घेऊन इन्स्पेक्टर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मंजूचा आत्मविश्वास, तिची मेहनत आणि प्रगती पाहून प्रेक्षकांना निश्चितच अभिमानाने भरून येईल. तिचं धाडस, चिकाटी आणि न्यायासाठीची लढाई आता अधिक जोमाने दिसणार आहे. मी स्वतःही या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे. इन्स्पेक्टर मंजू म्हणून अधिक दमदार अ‍ॅक्शन आणि नवीन स्टंट्ससाठी मी पूर्णपणे तयार आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.यापूर्वी तुम्ही आम्हाला जी आपुलकी आणि प्रेम दिलं, ते पुढेही तसंच लाभावं, हीच मनापासून इच्छा. तुमच्या मनोरंजनात कोणतीही कमी आम्ही भासू देणार नाही

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande