गोव्यातील आयुर्वेद संस्थेत ‘प्रयास’ मज्जासंस्था पुनर्वसन केंद्राचा प्रारंभ
पणजी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। आयुष मंत्रालयाच्या वतीने गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत प्रयास या एकात्मिक मज्जासंस्था पुनर्वसन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. दहाव्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाल
Union Minister of State Prataprao Jadhav inaugurated the centre


AYUSH inaugurated the Prayas Integrated All India Ayurveda Institute, Goa


पणजी, 26 सप्टेंबर (हिं.स.)। आयुष मंत्रालयाच्या वतीने गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत प्रयास या एकात्मिक मज्जासंस्था पुनर्वसन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. दहाव्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. हे केंद्र सुरु झाल्याने आयुष क्षेत्राने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या कार्यक्रमाला उर्जा आणि नव तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री, श्रीपाद नाईक, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते.

प्रयास हे देशातील अशा प्रकारचे पहिले बहु शाखीय केंद्र आहे. या केंद्रात आयुर्वेद, भौतिकोपचार, योग साधना, वाणी उपचार, ऑक्युपेशनल उपचारआणि आधुनिक बालरोगशास्त्र या सुविध एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. सर्वंकष आणि रुग्ण केंद्रित मज्जासंस्था पुनर्वसन व्यवस्थेची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने या केंद्राची आखणी केली गेली आहे. याअंतर्गत विशेषतः मज्जातंतूविषयक आणि शारिरीक - मानसिक वाढीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलांवर भर दिला गेला आहे.

यावेळी प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले. आयुष मंत्रालय पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक औषधांशी समन्वय साधणाऱ्या उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयास हा एकात्मिक पुनर्वसनाचे एक प्रारुप आहे. या केंद्रात उपचारांसोबतच, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना नव्या गुणवत्तेचे जीवनमान आणि नवी आशाही मिळते, असे ते म्हणाले.

मज्जातंतूविषयक तसेच मुलांच्या शारिरीक - मानसिक जडणघडणीशी संबंधित आजारांवर मात करण्यासाठी पुनर्वसन सेवांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने अमलात आणलेले हे अभिनव प्रारुप आरोग्यविषयक जटील आव्हानांचा सामना करत असलेल्या असंख्य कुटुंबांसाठी नवी आशा प्रदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, प्राध्यापक पी. के. प्रजापती यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. प्रयास केंद्राचा प्रारंभ म्हणजे, आरोग्य विषयक जटिल समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने, अभिनव स्वरुपाच्या एकात्मिक प्रारुपांना प्राधान्यक्रमावर ठेवत अमलात आणण्याच्या संस्थेच्या दृष्टिकोनाचेच प्रतिबिंब आहे आहे ते म्हणाले. आयुर्वेद, योग आणि आधुनिक पुनर्वसन शास्त्राच्या एकात्मिकीकरणातून बाल मज्जातंतूविषयक समस्यावरील आरोग्यविषयक निगा आणि उपचारांचा विस्तार करता येईल, तसेच याबाबतीतील सर्वंकष उपचारांसाठी नवे मापदंड स्थापित करता येईल अशा तथ्याधारीत उपाययोजना विकसित करण्याचे उद्दिष्ट संस्थेने बाळगले असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या अधिष्ठाता, प्राध्यापक सुजाता कदम यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रयासच्या माध्यमातून ही संस्था एकात्मिक, रुग्ण-केंद्रित मज्जातंतूविषयक पुनर्वसन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या शारिरीक आणि मानसिक वाढीविषयी आणि मज्जातंतूविषयक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलांना सर्वसमावेशक आरोग्यविषयक उपचार आणि निगा पुरवण्याला, तसेच आरोग्य सेवेतील आयुष-आधारित नवोन्मेषाला आयाम देणाऱ्या संशोधन आणि प्रशिक्षणाला हातभार लावणे यावर संस्थेने अधिक भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे सचिव, गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, डॉक्टर सुमीत गोयल, डॉक्टर राहुल घुसे, डॉक्टर समृद्धी, डॉक्टर दीक्षा, डॉक्टर शालिनी, तसेच नेलिशा, शेफाली आणि जॅनीस हे गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.

हा महत्त्वाकांक्षी यशदायी टप्प्याच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींना अनुसार पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक पद्धतींचे सर्वोत्तम मिलाफ घडवून आणण्याच्या दृष्टीने एकात्मिक आरोग्य सेवेबाबतचा आपला दृष्टिकोन अधिक दृढ केला आहे. प्रयास हे केवळ एक केंद्र नाही तर ते आरोग्यविषयक उपचार आणि निगा, करुणा आणि सर्वसमावेशक उपचारासंबंधीची एक वचनबद्धता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande