‘तारा और आकाश : लव बियॉन्ड रियल्म्स’ प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आणि Whispers from Eternity Films यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्वित्झर्लंड पर्यटनाच्या सहयोगाने तयार करण्यात आलेला बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट ‘तारा और आकाश : Love Beyon
‘Tara Aur Akash: Love Beyond Realms’ hits theaters


मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आणि Whispers from Eternity Films यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्वित्झर्लंड पर्यटनाच्या सहयोगाने तयार करण्यात आलेला बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट ‘तारा और आकाश : Love Beyond Realms’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनिवास अबरोल यांनी केले असून, त्याचे सादरीकरण भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

चित्रपटाचे वितरण PVR Pictures करणार आहेत. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमधील मॉन्ट्रो, वेवे, टिसिनो आणि ज्युरिख अशा अप्रतिम ठिकाणी झाले आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना एक अद्वितीय आणि जादुई अनुभव मिळणार आहे.

कथानक एका २२ वर्षीय मुली ताराच्या भोवती फिरते, जी आपल्या आजीच्या निधनानंतर स्वित्झर्लंडला प्रवासाला जाते. तिथे तिची भेट होते आकाशशी. नियतीने घडवलेल्या या भेटीत प्रेम फुलतं, पण त्यांना लवकरच कळतं की ते दोघं कधीच एकत्र राहू शकत नाहीत.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत जितेश ठाकुर (निर्माता आणि अभिनेता) व अलंकृता बोरा असून, दिग्गज कलाकार अमोल पालेकर, दीप्ती नवल आणि बृजेंद्र काला यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप सोडली आहे –

Toronto International Film Festival 2024 मध्ये जागतिक प्रीमियर

Indian International Film Festival 2024 (Goa) मध्ये आशियाई प्रीमियर

ही फक्त प्रेमकथा नाही तर प्रेम, नियती आणि आत्म्याच्या आध्यात्मिक प्रवासाला स्पर्श करणारी एक जादुई सफर आहे. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाला जागतिक पटलावर नेणारा हा सिनेमा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

प्रेमाच्या, अध्यात्माच्या आणि नियतीच्या जादुई प्रवासासाठी सज्ज व्हा..

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande