मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या महाकाव्यात्मक ‘जटाधारा’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास पर्वणी आहे.
टीझर, पोस्टर्स आणि ७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या रिलीज डेटनंतर आता मेकर्सनी चित्रपटाचं पहिलं गाणं ‘सोल ऑफ जटाधारा’ प्रदर्शित केलं आहे.
राजीव राज यांनी संगीतबद्ध आणि गायलेलं हे गाणं पारंपरिक संगीत आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम आहे. सुरुवातीला ऐकू येणारे “ॐ नमः शिवाय” चा मंत्र प्रेक्षकांना अध्यात्मिक अनुभूती देतो. हे गाणं रॉ एनर्जी आणि आध्यात्मिक याचं अप्रतिम मिश्रण असून प्रेक्षकांना जटाधारा च्या रहस्यमय विश्वात घेऊन जातं.
या चित्रपटात सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हासोबत दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवि प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झांसी, राजीव कनकला, सुबलेखा सुधाकर आदी दमदार कलाकार झळकणार आहेत.
‘जटाधारा’ हा फक्त एक चित्रपट नाही तर अंधार विरुद्ध प्रकाश, चांगुलपणा विरुद्ध वाईट, मानव इच्छाशक्ती विरुद्ध ब्रह्मांडीय नियती यांचा थरारक संग्राम दाखवणारा अनुभव आहे. हिंदी आणि तेलुगू भाषेत ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सफर घडवणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर