नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली ही भेट औपचारिक स्वरूपाची होती.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे नवीन जबाबदारीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी