पवन कल्याणच्या ‘ओजी’ने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल १५० कोटी
मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। अभिनेता पवन कल्याण आपल्या बहुचर्चित ''दे कॉल हिम ओजी'' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. २५ जुलै रोजी चित्रपटगृहांत रिलीज होताच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तिकिट खिडक्यांवर उसळली. गुन्हेगारी आणि अॅक्शनने
ओजी


मुंबई, 26 सप्टेंबर, (हिं.स.)। अभिनेता पवन कल्याण आपल्या बहुचर्चित 'दे कॉल हिम ओजी' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. २५ जुलै रोजी चित्रपटगृहांत रिलीज होताच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तिकिट खिडक्यांवर उसळली. गुन्हेगारी आणि अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं.

बॉक्स ऑफिसची आकडेवारी नोंदवणाऱ्या ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, 'दे कॉल हिम ओजी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सर्व भाषांमध्ये मिळून तब्बल ७० कोटींचा गल्ला जमवला. त्याचबरोबर प्री-सेल्समधून चित्रपटाने २०.२५ कोटींची कमाई आधीच केली होती. त्यामुळे 'ओजी'चा पहिल्या दिवसाचा एकूण व्यवसाय तब्बल ९०.२५ कोटींवर पोहोचला.

फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातदेखील 'ओजी'चा जबरदस्त प्रभाव दिसून आला आहे. जगभरात रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल १५० कोटींची कमाई केली. या चित्रपटाचा बजेट सुमारे २५० कोटी रुपयांचा आहे. 'ओजी'मध्ये पवन कल्याणसोबत इमरान हाश्मी, प्रियंका मोहन, अर्जुन दास, श्रिया रेड्डी आणि प्रकाश राज यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून कथा देखील त्यांनीच लिहिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande