मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। इंडियन आयडल १२ फेम सायली कांबळे लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील या अविस्मरणीय प्रवासाची घोषणा केली आहे. फोटोमध्ये सायलीने हिरवी साडी परिधान केली आहे. तिच्या चेह-यावर एका वेगळ्याच प्रकारचे तेज दिसत आहे.
सायलीने भावूक कॅप्शन लिहित देवाचे आभार मानले आणि तिने लिहिलं आहे की, “आमच्या मनात आनंद आणि उत्सुकता दाटून आली आहे. मी आणि धवल तुम्हाला हे सांगताना खूप उत्साहित आहोत की, आमचं छोटंसं बाळ लवकरच जगात येणार आहे. आम्ही आमच्या बाळाला भेटण्यासाठी आतुर आहोत. खूप सारं प्रेम घेऊन तो/ती आमच्या भेटीला येत आहे.”
तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि इंडियन आयडलमधील सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर