ऑस्कर नामांकित 'होमबाउंड' ची बॉक्स ऑफिस कामगिरी निराशाजनक
मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। ऑस्कर नामांकित ‘होमबाउंड’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ सप्टेंबर) जगभर प्रदर्शित झाला. जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून ते
ऑस्कर नामांकित 'होमबाउंड' ची बॉक्स ऑफिस कामगिरी निराशाजनक


मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। ऑस्कर नामांकित ‘होमबाउंड’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ सप्टेंबर) जगभर प्रदर्शित झाला. जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून ते अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले आहे.

भारताकडून ऑस्करसाठी २४ चित्रपटांच्या यादीवर विचार झाला होता. या यादीत अभिषेक बच्चनचा ‘आय वाँट टू टॉक’, ‘पुष्पा २’, ‘द बंगाल फाइल्स’, ‘जुगनुमा’ आणि ‘फुले’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. मात्र या सर्वांमधून ‘होमबाउंड’ची निवड करण्यात आली. नीरज घायवान दिग्दर्शित हा चित्रपट भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर श्रेणीसाठी अधिकृतरित्या पाठविण्यात आला आहे.

पहिल्या दिवसाचे कलेक्शन

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘होमबाउंड’ने भारतात पहिल्या दिवशी केवळ सुमारे ३० लाख रुपयांचा व्यवसाय केला. हे कलेक्शन ईशान खट्टरच्या ‘धडक’पेक्षा खूपच कमी आहे. ‘धडक’ने पहिल्याच दिवशी ८.७१ कोटी रुपये कमावले होते. त्याचप्रमाणे ‘फोन भूत’ने २.०५ कोटी तर विशाल जेठवा अभिनित ‘सलाम वेंकी’ने पहिल्या दिवशी ४५ लाख रुपये कमावले होते.

कथा

उत्तर भारतातील एका छोट्या गावातील दोन बालमित्रांची कहाणी या चित्रपटातून रंगविण्यात आली आहे. पोलिस दलात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या आयुष्याला नवी दिशा तर देतेच, पण त्यांना रोजगारासोबतच सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळवून देते.

‘होमबाउंड’ची निर्मिती धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली करण जोहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा नीरज घायवान यांनी सांभाळली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande