तमिळनाडू : अभिनेता विजयच्या सभेत चेंगराचेंगरी; 31 जणांचा मृत्यू
चेन्नई, 27 सप्टेंबर (हिं.स.) : तमिळनाडूमधील करूर येथे अभिनेता विजय यांच्या राजकीय सभेदरम्यान शनिवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यात 31 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत नोंद स्थानिक रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी केली आहे. घटनेच्या कारणांची
दाक्षिणात्य अभिनेता विजय रॅलीला संबोधित करताना


चेन्नई, 27 सप्टेंबर (हिं.स.) : तमिळनाडूमधील करूर येथे अभिनेता विजय यांच्या राजकीय सभेदरम्यान शनिवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यात 31 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत नोंद स्थानिक रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी केली आहे. घटनेच्या कारणांची चौकशी सुरू असून प्रचंड गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विजय यांच्या ‘तमिळगा वेत्रि कळगम’ (टीव्हीके) या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या रॅलीसाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता.. हे सर्वजण विजय यांची सभा पाहण्यासाठी किमान 6 तासांपासून वाट पाहत होते. गर्दीचा प्रचंड दबाव वाढल्यामुळे उभे राहणेही अशक्य झाले आणि ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि टीव्हीके पक्षाच्या समर्थकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “तमिळनाडूच्या करूर येथे एका राजकीय सभेदरम्यान घडलेली ही दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना बळ मिळो, ही प्रार्थना करतो. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.” असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande