सूर्या–ज्योतिका यांच्या मुलीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण
मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। साउथ इंडस्ट्रीतील मोठं नाव असलेल्या सूर्या आणि ज्योतिकाची मुलगी दिया हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू वेब सिरीज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’ने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली
सूर्या–ज्योतिका यांच्या मुलीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण


मुंबई, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। साउथ इंडस्ट्रीतील मोठं नाव असलेल्या सूर्या आणि ज्योतिकाची मुलगी दिया हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू वेब सिरीज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’ने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्याच्या कामगिरीचं भरभरून कौतुक झालं. पहिल्याच सिरीजमधून आर्यनने स्वतःची ओळख मजबूत केली. आता अशाच मार्गावर आणखी एक स्टार किड पाऊल टाकत आहे.

सूर्या आणि ज्योतिका यांच्या मुलगी दीयाने फक्त १७ व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. मात्र तिने अभिनयाचा मार्ग निवडला नसून आर्यनप्रमाणे कॅमेऱ्यामागे राहून आपले हुनर दाखवण्याचं ठरवलं आहे.

दीयाने आपल्या कौटुंबिक बॅनर २डी एंटरटेनमेंटअंतर्गत निर्मित डॉक्यू-ड्रामा शॉर्ट फिल्म ‘लीडिंग लाइट’द्वारे दिग्दर्शनात डेब्यू केलं आहे. या विशेष प्रसंगी सूर्या आणि ज्योतिका यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या मुलीला भरभरून शुभेच्छा दिल्या.

सध्या ‘लीडिंग लाइट’ लॉस एंजेलिसमधील रीजेंसी थिएटरमध्ये ऑस्कर क्वालिफाइंग रन अंतर्गत प्रदर्शित होत असून ही दीयाच्या करिअरची दमदार सुरुवात मानली जात आहे. या चित्रपटात त्या महिलांचे जीवन आणि संघर्ष मांडले आहे, ज्या बॉलीवूडमध्ये कॅमेऱ्याच्या मागे लाइटिंगसारखं महत्त्वाचं काम करतात, पण त्यांची दखल घेतली जात नाही. त्यांच्या कथा क्वचितच लोकांपर्यंत पोहोचतात. अशा संवेदनशील आणि वेगळ्या विषयावर डेब्यू करणे दीयाच्या धाडसाचं आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे.

ही शॉर्ट फिल्म २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रोज रीजेंसी थिएटरमध्ये प्रदर्शित केली जात आहे. आपल्या अनोख्या दृष्टिकोनामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे ‘लीडिंग लाइट’ प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची निर्मिती सूर्या आणि ज्योतिका यांनी केली असून, त्यांनी आपल्या मुलीने दिग्दर्शित केलेल्या या डॉक्यू-ड्रामाला पाठिंबा देण्याचा अभिमान असल्याचं सांगितलं आहे.

सूर्या आणि ज्योतिका ही जोडी तमिळ सिनेमातील सर्वात लोकप्रिय स्टार जोड्यांपैकी एक मानली जाते. २००६ मध्ये त्यांनी लग्न केलं असून सध्या ते दोन मुलांचे पालक आहेत. त्यांची मोठी मुलगी दीया, तर धाकटा मुलगा देव आहे. व्यस्त चित्रपटसृष्टीतील वेळापत्रक असूनही सूर्या आणि ज्योतिका कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर विशेष भर देतात. पूर्वी हे दाम्पत्य चेन्नईत राहत होतं; मात्र मुलांच्या शिक्षणाचा विचार करून काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande