नवी दिल्ली, 27 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री मनोहर लाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने ‘स्वच्छोत्सव गीत’ (स्वच्छोत्सव अँथेम) प्रकाशित केले. हे गीत ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सादर करण्यात आले आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये मनोहर लाल म्हणाले, “स्वच्छ भारत अभियान आज एक व्यापक आणि यशस्वी जनआंदोलन बनले आहे. स्वच्छतेचे पालन हे फक्त एका दिवसापुरते मर्यादित न राहता आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसाचा अविभाज्य घटक असावे. चला, स्वच्छतेला आपल्या स्वभावाचा व संस्कारांचा भाग बनवूया आणि एक उज्ज्वल, स्वच्छ, निरोगी व समृद्ध राष्ट्र उभारण्यात सहभागी होऊया.”
या गीताला गायिका श्रेय्या घोषाल आणि संगीतकार-गायक अमित त्रिवेदी यांनी आपला स्वर दिला असून, गीताचे शब्द शैलेन्द्र सिंह सोढी यांनी लिहिले आहेत. हे गीत फक्त सुरेल नाही, तर नागरिकांना प्रेरणा देणारा संदेशही देतं. प्रत्येकाने स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा संस्कार म्हणून स्वीकारावे, अशी यातून आवाहन करण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की, ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अभियानांतर्गत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यांचा उद्देश जनतेत स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे आणि त्याला अधिक सक्षम राष्ट्रीय चळवळ बनवणे हा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule