एअर इंडिया एक्सप्रेस 'पेडे सेल 2025' ची घोषणा
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सण-उत्सवाच्या काळात एअर प्रवासासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने ''पेडे सेल 2025'' ची घोषणा केली असून, या विशेष ऑफर अंतर्गत देशांतर्गत तिकिटे फक्त १,२०० रुपयांपासून तर आंतरराष
Air India Express


मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सण-उत्सवाच्या काळात एअर प्रवासासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने 'पेडे सेल 2025' ची घोषणा केली असून, या विशेष ऑफर अंतर्गत देशांतर्गत तिकिटे फक्त १,२०० रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकिटे ३,७२४ रुपयांपासून सुरू होत आहेत. या सेलमुळे बजेटमध्ये हवाई प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक या ऑफरअंतर्गत १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तिकिटे बुक करू शकतात. प्रवासाचा कालावधी १२ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आहे. प्रवाशांना फक्त स्वस्त तिकिटेच नव्हे, तर FabDeals च्या माध्यमातून हॉट मील्स, सीट निवड, अतिरिक्त सामान आणि Xpress Ahead प्रायोरिटी सर्विसेसवरही खास सवलती मिळतील.

बुकिंगची सुरुवात २८ सप्टेंबर २०२५ पासून सर्व चॅनेल्सवर झाली, पण ग्राहकांना अधिक फायदा मिळावा म्हणून २७ सप्टेंबरपासून एअर इंडिया एक्सप्रेसच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर FLYAIX कोड वापरून 'अर्ली ॲक्सेस' चा लाभ घेता आला. एअरलाइनने म्हटले आहे की ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

तिकिटांचे दर दोन श्रेणींमध्ये निश्चित करण्यात आले आहेत. Xpress Lite श्रेणीत चेक-इन बॅगेजचा समावेश नाही; देशांतर्गत तिकीट १,२०० रुपयांपासून आणि आंतरराष्ट्रीय तिकीट ३,७२४ रुपयांपासून उपलब्ध आहे. Xpress Value श्रेणीत देशांतर्गत तिकीट १,३०० पासून आणि आंतरराष्ट्रीय तिकीट ४,६७४ रुपयांपासून सुरू होते. मोबाइल ॲपवर बुकिंग केल्यास कन्व्हेनिअन्स फी पूर्णपणे माफ आहे. याशिवाय, चेक-इन बॅगेजसाठीही सवलती मिळत आहेत; देशांतर्गत प्रवासासाठी १५ किलो सामान १,५०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २० किलो सामान २,५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande