दिवाळीत मथुरेकडे विशेष वातानुकूलित रेल्वे गाडी
पुणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)। दसरा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त रेल्वे प्रवासाला वाढती गर्दी पाहता मध्ये रेल्वे विभागाने नव्याने उत्तरेकडे ६० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे या गाडीच्या
Railway


पुणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)। दसरा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त रेल्वे प्रवासाला वाढती गर्दी पाहता मध्ये रेल्वे विभागाने नव्याने उत्तरेकडे ६० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे या गाडीच्या तब्बल २४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.गाडी क्रमांक ०१४९३ ही गाडी ६ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी आणि गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता निजामुद्दीन येथे पोहचेल. सणांच्या काळात या रेल्वेच्या एकूण १२ फेऱ्या होतील. तर गाडी क्रमांक ०१४९४ ही गाडी ७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार आणि शुक्रवारी रात्री ९.२५ मिनिटांनी हजरत निजामुद्दीन स्थानकावरून पुण्याच्या दिशेने रवाना होईल, आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ ला पुणे स्थानकात पोहचेल. अशा यादेखील १२ फेऱ्या सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. लोणावळा, कल्याण, भिवंडी, वसई, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जं., गोध्रा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर जं. आणि मथुरा या स्थानकांवरून ही गाडी धावेल. या गाड्यांना १६ वातानुकूलित आणि तृतीय श्रेणीतील आणि २ सामान्य डबे असणार आहेत.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande