करूर चेंगराचेंगरी प्रकरण : थलापती विजयसह, मुख्यमंत्री स्टालिन आणि पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
चेन्नई, 28 सप्टेंबर (हिं.स.)।तामिळनाडूमधील करूर जिल्ह्यात अभिनेता आणि राजकारणी थलापती विजय यांच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 9 लहान मुले आणि 16 हून अधिक महिला आहेत. तसेच सुमारे 70 जण जखमी झाले आह
करूर चेंगरा चेंगरी प्रकरण


चेन्नई, 28 सप्टेंबर (हिं.स.)।तामिळनाडूमधील करूर जिल्ह्यात अभिनेता आणि राजकारणी थलापती विजय यांच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 9 लहान मुले आणि 16 हून अधिक महिला आहेत. तसेच सुमारे 70 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर विजय यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

विजय यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले, आपल्या प्रियजनांना गमावलेले माझे सर्व नातेवाईक, तुमच्याशी मी हे दु:ख वाटून घेतो. हा एक असाच अपूरणीय तोटा आहे. कोणतीही सांत्वना आपले दु:ख कमी करू शकत नाही.तरीही, आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून, मी माझ्या कर्तव्याप्रमाणे

प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 20 लाख रुपये आणि जखमी नातेवाईकांना 2 लाख रुपये देऊ करतो. हा आर्थिक मदत फार मोठी नाही, पण एक भावनिक आधार म्हणून ती दिली जात आहे.”

तर या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 1 लाख रुपये देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची अनुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली.

जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

करूर नगर पोलिसांनी टीव्हीके पक्षाचे पश्चिम जिल्हा सचिव मथियालगन, महासचिव आनंद, आणि संयुक्त सचिव निर्मल कुमार यांच्यासह अनेकांवर भारतीय न्याय संहिताच्या कलम 109 – खुनाचा प्रयत्न,कलम 110 – नकळत खुनाचा प्रयत्न, कलम 125(ब) – उतावळेपणा किंवा निष्काळजीपणामुळे इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येणे, कलम 223 – शासकीय कर्मचाऱ्याने कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande