सेलेना गोमेझने संगीत निर्माता बेनी ब्लँकोशी बांधली लग्नगाठ
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ आता अधिकृतपणे विवाहबद्ध झाली आहे. तिने संगीत निर्माता-गीतकार बेनी ब्लँकोशी लग्न केले आहे. सेलेना हिने वयाच्या ३३ व्या वर्षी तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असलेल्या बेनीचा हात हातात घेतला. त
सेलेना गोमेझने संगीत निर्माता बेनी ब्लँकोशी लग्न केले


मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ आता अधिकृतपणे विवाहबद्ध झाली आहे. तिने संगीत निर्माता-गीतकार बेनी ब्लँकोशी लग्न केले आहे. सेलेना हिने वयाच्या ३३ व्या वर्षी तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असलेल्या बेनीचा हात हातात घेतला. तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची घोषणा करत सुंदर फोटो शेअर केले. सेलेना आणि बेनीने ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत आणि जगभरातील चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत. फोटोंमध्ये या जोडप्याचे एकमेकांवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. सेलेना आणि बेनीने २०२३ मध्ये आपलं नातं सार्वजनिक केलं होतं, तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.

हा खास दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी सेलेनाने कोणतीही कसर सोडली नाही. तिच्या लग्नाच्या पोशाखापासून ते निमंत्रण पत्र आणि ठिकाणापर्यंत सर्व काही अपवादात्मक होते. लग्नाच्या निमंत्रण पत्रांची रचना करण्याची जबाबदारी एका मेक्सिकन कंपनीने घेतल्याचे वृत्त आहे. या कार्डांची एक झलक सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. सेलेना आणि बेनी ब्लँकोच्या लग्नाला अनेक व्हीआयपी पाहुण्यांनी हजेरी लावली होती. सेलेनाने तिच्या पाहुण्यांच्या राहण्यासाठी भव्य व्यवस्था केली होती, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेलर स्विफ्ट इतर पाहुण्यांसोबत राहिली नाही. तिने कॅलिफोर्नियातील मोंटेसिटो येथील लग्नस्थळाजवळ स्वतःसाठी एक खाजगी लॉज बुक केला.

बेनीचे खरे नाव बेंजामिन जोसेफ लेव्हिन आहे. तो एक प्रसिद्ध रेकॉर्ड निर्माता, गीतकार आणि संगीत कलाकार आहे. तो स्वतःची गाणी लिहितो आणि रेकॉर्ड करतो. त्याने सेलेनाचा माजी प्रियकर जस्टिन बीबरसोबत देखील काम केले आहे. याशिवाय, त्याने एड शीरन, हॅल्सी, केटी पेरी, केशा, ब्रिटनी स्पीयर्स आणि रिहाना सारख्या मोठ्या स्टार्ससाठी अनेक हिट गाणी लिहिली आणि तयार केली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande