चिपळूणच्या नमो युवा रन मॅरेथॉनमध्ये धावले 900 स्पर्धक
रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत ९०० हून अधिक स
चिपळूणच्या नमो युवा रन मॅरेथॉनमध्ये धावले 900 स्पर्धक


रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत ९०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा दोन प्रकारांमध्ये घेण्यात आली.

नमो युवा रन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मेडल, सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. चार गटांमध्ये झाल्या. या संपूर्ण स्पर्धेत ७५ हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चातर्फे करण्यात आले होते.

पाच किलोमीटर धावणे पुरुष गटात सिद्धेश बर्जे, सूरज कदम, ओंकार बैकर, यश शिर्के, स्वराज जोशी, महिला गटात खुशी हसे, प्रमिला पाटील, तन्वी मल्हार, कोमल मोहिते, श्रुतिका वरक यांनी अव्वल कामगिरी केली. तीन किलोमीटर धावणे मुलांच्या गटात शुभम शितप, पृथ्वी राजभर, रोहित राठोड, अथर्व दवंडे, आयुष बर्जे, सुजल घाणेकर, विपुल साळवी, विराज निवाते, तर मुलींच्या गटात इच्छा राजबार, उमेरा सय्यद, सानिका डिके, अनुष्का खेराडे, मंजिरी पावसकर, मृणाली खेराडे, श्रेया बने, वैभवी सोलकर, वैभवी ढगळे यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande