कॅनबेरा, २९ सप्टेंबर (हिं.स.) - भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर-२१ संघाचा १-० असा पराभव केला. कॅनबेरा येथील नॅशनल हॉकी सेंटर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात कनिका सिवाचने 32 व्या मिनिटाला भारतासाठी निर्णायक गोल केला.
दोन्ही संघांमध्ये पहिल्या सत्रात चुरशीची लढत झाली. पण तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांत कनिका सिवाचच्या महत्त्वपूर्ण मैदानी गोलने भारताचा विजय निश्चित केला. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलिया अंडर-२१ संघाविरुद्ध सलग दोन सामने गमावले होते. पण या विजयासह भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच परतणार आहे. आणि उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची या संघाला आशा असणार आहे.
भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या प्रीमियर हॉकी वन लीग क्लब, कॅनबेरा चिल विरुद्ध असेल. हे सामने अनुक्रमे ३० सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत आणि त्यानंतर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे