नागपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। उत्सवाचा मौसम जवळ येताच सोनाटाने आपल्या ग्राहकांसाठी खास आनंदाची बातमी आणली आहे. भारतातील लोकप्रिय घड्याळ ब्रँड सोनाटाने आपले नवीन ‘फेस्टिव्ह कलेक्शन २.०’ लाँच केले आहे. पारंपरिकतेचा साज आणि आधुनिक डिझाइनचे मिश्रण असलेल्या या घड्याळांच्या कलेक्शनमुळे सणासुदीचे दिवस अधिक लक्षवेधी आणि संस्मरणीय ठरणार आहेत.
हे नवीन कलेक्शन केवळ वेळ दाखवणारे उपकरण नसून, सणासुदीच्या शुभेच्छा आणि आठवणी जपणारे एक स्टायलीश अॅक्सेसरी म्हणूनही ग्राह्य धरले जात आहे. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र अशा प्रकारांमध्ये हे घड्याळांचे नवे मॉडेल्स उपलब्ध असून, प्रत्येक डिझाइनमध्ये एक वेगळीच झळाळी आहे.
पुरुषांसाठी खास डिझाइन
पुरुषांसाठीच्या कलेक्शनमध्ये समृद्ध डायल, बोल्ड केस डिझाइन, क्लासिक रोमन मार्कर्स आणि क्रोको-पॅटर्न स्ट्रॅप्स वापरण्यात आले आहेत. निळ्या व हिरव्या डायलचे पर्याय विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. क्रोनोग्राफ, मल्टी-फंक्शन डे आणि डेट, तसेच सूर्य-चंद्र निर्देशक यांसारख्या वैशिष्ट्यांनी हे घड्याळ केवळ सुंदरच नव्हे, तर उपयुक्तही ठरते.
महिलांसाठी झळाळी आणि साजेसा ग्लॅमर
महिलांसाठीच्या घड्याळांमध्ये रोजगोल्ड पट्ट्यांची झळाळी, जाळीदार ब्रेसलेट्स, चमकदार स्टड पीसेस आणि नाजूक लिंक्स यांचा समावेश आहे. पॉलिश फिनिश आणि उत्सवी लूक यामुळे या घड्याळांमध्ये प्रत्येक पोशाखाला पूरक ठरण्याची क्षमता आहे.
ब्रँडचे वक्तव्य
या लाँचच्या निमित्ताने सोनाटाचे उत्पादन प्रमुख निशांत मित्तल यांनी सांगितले: “फेस्टिव्ह कलेक्शन २.० म्हणजे उत्सव साजरे करण्याची स्टाईलिश पद्धत. प्रत्येक घड्याळ आनंद आणि उबदारपणाची अभिव्यक्ती आहे – तुम्ही ते स्वतः वापरा, भेट द्या किंवा सण साजरा करा, प्रत्येक प्रसंगासाठी ते योग्य आहे. हे कलेक्शन तुमच्या खास क्षणांमध्ये चमक आणेल आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करेल.”
उपलब्धता आणि खरेदी पर्याय
सोनाटाचे फेस्टिव्ह कलेक्शन २.० हे देशभरातील सर्व सोनाटा स्टोअर्समध्ये तसेच www.sonatawatches.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे. या खास कलेक्शनमुळे तुमचे सणासुदीचे क्षण अधिक देखणे आणि लक्षात राहणारे ठरतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule