विवो V60e 5G : किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लाँचपूर्वीच उघड
मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। विवो कंपनी लवकरच भारतात आपला नवा स्मार्टफोन विवो V60e 5G लाँच करणार असून लाँचपूर्वीच या फोनची किंमत, स्टोरेज व्हेरियंट आणि महत्वाची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. फ्लिपकार्टवर दिसलेल्या लिस्टिंगमुळे आणि टिप्स्टर परास गुगलानी य
Vivo V60e 5G mobile


मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। विवो कंपनी लवकरच भारतात आपला नवा स्मार्टफोन विवो V60e 5G लाँच करणार असून लाँचपूर्वीच या फोनची किंमत, स्टोरेज व्हेरियंट आणि महत्वाची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. फ्लिपकार्टवर दिसलेल्या लिस्टिंगमुळे आणि टिप्स्टर परास गुगलानी यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार या मिड-रेंज फोनबद्दल बरीच माहिती उघड झाली आहे. विवो V60e 5G हा इतर V सीरीजच्या मॉडेल्सपेक्षा किंमतीत स्वस्त असणार असून तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध होईल. 8GB+128GB मॉडेलची किंमत 34,999/28,749 रुपये, 8GB+256GB मॉडेलची किंमत 36,999/30,749 रुपये आणि 12GB+256GB मॉडेलची किंमत 38,999/32,749 रुपये अशी असू शकते. मात्र ही अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास विवो V60e 5G हा आपल्या सेगमेंटमधला पहिला 200MP मुख्य कॅमेरा घेऊन येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासोबतच 85mm टेलिफोटो लेन्स, IP68 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स, 6500mAh क्षमतेची बॅटरी आणि 90W वायर्ड चार्जिंग सपोर्ट असणार आहे. फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल – एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड. डिझाइन बाबतीत हा विवो V60 सारखाच दिसेल. परफॉर्मन्ससाठी यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360T प्रोसेसर, 12GB पर्यंत RAM आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.हा स्मार्टफोन अधिकृतरीत्या 7 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात लाँच होईल अशी माहिती आहे, मात्र कंपनीकडून अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande