वॉशिंग्टन, 30 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकन गायक‑गीतकार आणि गिटारवादक जॉन मेयर प्रथमच भारतात आपली सादरीकरण देण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२६ मध्ये ते भारत दौऱ्यावर येणार असून एक खास संगीत मैफल सादर करणार आहेत. त्यांनी सांगितले की, भारतात परफॉर्म करणे हे त्याच एक जुनं स्वप्न होत.
“बुक माय शो” या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये माहिती देण्यात आली आहे की अमेरिकन गायक जॉन मेयर २०२६ सालच्या जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईच्या प्रतिष्ठित महालक्ष्मी रेसकोर्स येथे आपली संगीत सादरीकरण सादर करतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक १४ ऑक्टोबर २०२५ पासून सामान्य तिकीट खरेदी करू शकतील. या तिकिटाच्या माध्यमातून संगीतप्रेमींना हा कार्यक्रम थेट लाईव्ह पाहण्याची संधी मिळेल.
भारत दौऱ्याबद्दल बोलताना जॉन मेयर म्हणाले,“भारत हा माझ्या संगीत सादरीकरणाच्या खास स्थळांच्या यादीत खूप काळापासून होता. फक्त येथील रंगीबेरंगी संस्कृतीसाठी नाही, तर इथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात संगीत कसं मिसळलेलं आहे यासाठीही. अखेर मुंबईत परफॉर्म करण्याची संधी मिळत आहे, हे माझ्यासाठी आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे.”
४७ वर्षीय गायक जॉन मेयर आपल्या भावपूर्ण आवाज आणि गिटारवादनासाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांना ब्लूज, रॉक, लोक (लोकसंगीत) आणि पॉप संगीताच्या अप्रतिम मिश्रणासाठी देखील प्रसिद्धी मिळाली आहे. भारतातील अनेक संगीतप्रेमींना त्यांचे ‘रूम फॉर स्क्वेअर्स'' आणि 'कंटिन्युअम’ हे अल्बम्स खूपच आवडतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode