अमरावती : माहिती अधिकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)।माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत जनतेमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तथापि, सन 2025 चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे शासन निर्देशानुस
माहिती अधिकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)।माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत जनतेमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तथापि, सन 2025 चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे शासन निर्देशानुसार दि.29 स्पटेंबर, 2025 रोजी माहिती अधिकार दिन विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाला. यानिमित्ताने अधिकारी / कर्मचारी यांना माहिती अधिकार अंतर्गत महत्वाच्या तरतूदी व त्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्र.अपर आयुक्त रविंद्र हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून ऍड. राजेंद्र रा. पांडे (यशदा, पुणे) यांना आमंत्रित करण्यात आले होते. अॅड. पांडे हे यशदा, BARTI, महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकेडमी, महाराष्ट्र पोलिस ऍकेडमी यांसारख्या संस्थांमध्ये मानद व अतिथी व्याख्याता असून, विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये शासन व अपिलार्थीच्या वतीने युक्तीवाद करतात.त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. माहिती मागविण्याची प्रक्रिया, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी यांची कर्तव्य त्याच प्रमाणे अपिलीय अधिकारी, शासकीय उत्तरदायित्व याविषयी साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली. त्यांनी सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका, अभिलेख व्यवस्थापन, आणि माहिती अर्जास सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या पद्धती यावर सविस्तर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे वेळी माहिती अधिकार क्यूआर कोडचे विमोचन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले. सदर क्युआर कोडचे माध्यमातून नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व शाखांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज कोंडे, महसूल सहाय्यक यांनी केले. रविंद्र हजारे, प्र.अपर आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांनी अध्यक्ष स्थान भषविले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मनिषा ढोके, महसूल सहाय्यक यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande