चंद्रपूर : पं.स. सभापती पदासाठी आरक्षण सोडतबाबत 1 ऑक्टोबर रोजी सभा
चंद्रपूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधील सभापतीची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला यासाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे 1
चंद्रपूर : पं.स. सभापती पदासाठी आरक्षण सोडतबाबत 1 ऑक्टोबर रोजी सभा


चंद्रपूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधील सभापतीची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला यासाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजीत करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम 1962 मधील नियम 2 फ यातील तरतुदीनुसार राज्यातील 32 जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या सभापतींची पदे पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जातीकरीता सभापती पदांची संख्या- 1, अनुसूचित जाती (महिला) करीता सभापती पदांची संख्या – 1, अनुसूचित जमातीकरीता - 1, अनुसूचित जमाती (महिला) करीता – 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) करीता – 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) करीता – 2, सर्वसाधारणकरीता सभापती पदांची संख्या – 3 आणि सर्वसाधारण (महिला) करीता सभापती पदांची संख्या - 3 असे एकूण 15 पंचायत समिती सभापती पदांची संख्या आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande