लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।कव्हा तलावानजीक रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. सदरील रस्त्याचे काम करणाऱ्या अभियंत्यांना या संदर्भात सूचना देताना आमदार देशमुख म्हणाले की कोणत्याही प्रकारे गावकऱ्यांना याचा त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
लातूर तालुक्यातील कव्हा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रसंगी त्यांना रस्त्यावरून पाणी वाहून जात असल्याचे दिसले.रस्ता पाण्याखाली जाऊ नये, पाण्यामुळे रस्ता वारंवार बंद व खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यास त्यांना सांगितले आहे.
तसेच लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथे जाऊन, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देऊन धीर दिला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis