ऑस्कर विजेती निकोल किडमॅन आणि संगीतकार कीथ अर्बन होणार विभक्त
मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। ऑस्कर विजेती अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचे पती, लोकप्रिय संगीतकार कीथ अर्बन यांचे वैवाहिक आयुष्य आता तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तब्बल १९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दांपत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची म
ऑस्कर विजेती निकोल किडमॅन आणि संगीतकार कीथ अर्बन होणार विभक्त


मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। ऑस्कर विजेती अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचे पती, लोकप्रिय संगीतकार कीथ अर्बन यांचे वैवाहिक आयुष्य आता तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तब्बल १९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दांपत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच या दोघांमधील दुरावा वाढू लागला होता. कीथ यांनी नवे घर घेऊन तिकडे स्थलांतर केले आहे, तर निकोल अजूनही नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. पेज सिक्सच्या अहवालानुसार, निकोलला हा विभक्त होण्याचा निर्णय मान्य नव्हता आणि तिने नातं वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र वाढत्या तणावामुळे कीथ यांनी नॅशविलेतील घर सोडले आणि शहरातील दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. दरम्यान, निकोल आपल्या दोन मुलींची एकटीने काळजी घेत आहे.

निकोल आणि कीथ यांची पहिली भेट २००५ साली झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये दोघांचे सिडनी येथे लग्न झाले. लग्नानंतर या जोडप्याला दोन मुली झाल्या. तर, निकोलला याआधीच्या विवाहातून—अभिनेता टॉम क्रूझसोबतच्या संसारात—दोन दत्तक मुले होती.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या त्यांच्या १९व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त निकोल आणि कीथ यांनी इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचे आनंदी क्षण टिपलेली छायाचित्रे शेअर केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande