गाझा शांतता करारावर ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींचा पाठिंबा
नवी दिल्ली , 30 सप्टेंबर (हिं.स.)।गाझा येथे गेल्या अनेक काळापासून सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. ट्रम्प यांच्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन
गाझा शांतता करारावर ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींचा पाठिंबा


नवी दिल्ली , 30 सप्टेंबर (हिं.स.)।गाझा येथे गेल्या अनेक काळापासून सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. ट्रम्प यांच्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (३० सप्टेंबर) स्वागत केले आणि सहमती दर्शवत असेही सांगितले की इतर देशही या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या मताशी सहमत होतील, ज्यामुळे हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपुष्टात येईल. पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले, ‘‘आम्ही गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या योजनेचे स्वागत करतो. ही योजना पॅलेस्टिनी आणि इस्रायली जनतेसह संपूर्ण पश्चिम आशिया भागासाठी दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकासाचा एक चांगला मार्ग तयार करेल. आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष ट्रम्प यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देतील, ज्यामुळे संघर्ष समाप्त होईल आणि शांतता प्रस्थापित होईल.’’ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी गाझामधील संघर्ष समाप्त करण्यासाठी २० मुद्द्यांची योजना तयार केली आहे. या योजनेला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि मुस्लिम देशांचा पाठिंबा मिळाला आहे. आता अमेरिकेच्या या प्रस्तावाला मिसर आणि कतार यांनी हमासपुढे सादर केले आहे. हमासने या प्रस्तावाबाबत सांगितले की, कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी या मुद्द्यावर गांभीर्याने विचार केला जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीच्या निमित्ताने अरब आणि मुस्लिम देशांसोबत एक बैठक घेतली होती. त्याच वेळी गाझा पट्टीत शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांनी आपला प्रस्ताव मांडला. अमेरिकेने नंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देखील ही योजना सांगितली आणि पंतप्रधान नेतन्याहूंनीही ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा दर्शवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande