भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह भाजपमध्ये परतले
पाटणा, ३० सप्टेंबर (हिं.स.). २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शहााबादमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा खेळ खराब करणारे भोजपुरी चित्रपट सुपरस्टार पवन सिंह भारतीय जनता पक्षात परतले आहेत. ही माहिती बिहारचे पक्ष प्रभारी विनोद तावडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
पवन सिंह


पाटणा, ३० सप्टेंबर (हिं.स.). २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शहााबादमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा खेळ खराब करणारे भोजपुरी चित्रपट सुपरस्टार पवन सिंह भारतीय जनता पक्षात परतले आहेत. ही माहिती बिहारचे पक्ष प्रभारी विनोद तावडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. पण पवन सिंह यांनी अद्याप निवेदन जारी केलेले नाही.

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांची भेट घेतली. बैठकीनंतर तावडे म्हणाले, पवन सिंह भाजपमध्ये परतले आहेत. ते आधीही आमच्यासोबत होते आणि भविष्यातही आमच्यासोबत राहतील. ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेऊ शकतात. पवन सिंह यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे ते बिहार विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या तिकिटावर भोजपूर किंवा रोहतास येथील जागेवरून ते निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

पवन सिंह यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोल जागेसाठी उमेदवारी दिली होती. पण त्यांनी तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि नंतर बिहारमधील कराकट जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (सीपीआय-एमएल) चे राजाराम सिंह कुशवाह यांच्याकडून पराभव सहन करावा लागला होता. एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. राजाराम यांना ३,१८,७३०, पवन सिंह यांना २,२६,४७४ आणि कुशवाह यांना २,१७,१०९ मते मिळाली.-------------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande