अमरावती : संदीप चव्हाण यांना पोलीस आयुक्तांकडून क्लिनचिट
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याविरोधात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे तक्रारीद्वारे केलेल्या आरोपाचे खंडण करीत संदीप चव्हाणच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक
पीआय संदीप चव्हाण यांना पोलीस आयुक्तांकडून क्लिनचिट  आरोपाचे केले खंडन, एसीपींच्या चौकशी अहवालानंतर निर्णय


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याविरोधात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे तक्रारीद्वारे केलेल्या आरोपाचे खंडण करीत संदीप चव्हाणच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहतील, असे पो-लीस आयुक्तांनी स्पष्ट केले. ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक नितीन मोहोड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याविरुध्द पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले की, शहरात खुलेआम वरीली-मटका, दारुचे अवैध धंदे, जुगार अड्डे सुरू आहेत. तसेच चव्हाण यांची गुन्हे शाखेत केलेली नियुक्ती नियमबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दुसऱ्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे मोहोड यांनी तक्रारीत म्हटले होते. यावर पो-लीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व आरोपाचे खंडण करीत चव्हाण यांची नियुक्ती योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर जे आरोप केले आहे त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानी कुठलीच कारवाई केली नाही, त्यांना प्रमोशन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, तरीसुध्दा नितीन मोहोड यांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हे शाखेचे एसीपी चौकशी करीत आहेत. त्यांचा चौकशी अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande