लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाहून पुणे आणि मुंबई बस सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
पुणे - मुंबई बस सेवा पूर्ववत मध्यवर्ती बस स्थानक, लातूर येथून चालू करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मुरुड बस स्थानकावर उदगीर- पुणे बस चालक वाहकांचा खासदार डॉ. शिवाजीराव काळगे (लातूर लोकसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार देऊन सत्कार करण्यात आला.
मध्यवर्ती बस स्थानक लातूर येथून आता पूर्वीप्रमाणे सर्व बस याच बस स्थानकातून सुटत असल्यामुळे मुरुड व परिसरातील विद्यार्थी, महिला,नागरिकांची सोय झाली आहे. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा मुरुड बस स्थानकाचे नियंत्रक श्री बी. एच. देवकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्री संजय शेटे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार) श्री बी. एन. डोंगरे (जिल्हा उपप्रमुख शिवसेना, उबाठा) दिनेश नवगिरे (प्रदेश सचिव, राष्ट्रीय काँग्रेस) मोहित डोळसे मयूर काळुंखे यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis