भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांचं निधन
नवी दिल्ली , 30 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ते दिल्लीत एम्स रुग्णालयात गेल्या काही काळापासून दाखल होते. सोमवारीच (दि.२९) पंतप्रधान
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. विजय कुमार मल्होत्रा


नवी दिल्ली , 30 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ते दिल्लीत एम्स रुग्णालयात गेल्या काही काळापासून दाखल होते. सोमवारीच (दि.२९) पंतप्रधानांनी त्यांच्या राजकीय योगदानाचा आणि समाजसेवेचा गौरव करत त्यांचा उल्लेख केला होता. त्यांचे निधन भारतीय राजकारणासाठी आणि विशेषतः दिल्ली भाजपसाठी एक मोठी हानी मानली जात आहे.

विजय कुमार मल्होत्रा यांचा जन्म ३ डिसेंबर १९३१ रोजी लाहौर, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला. ते कविराज खजान चंद यांची सात अपत्यांपैकी चौथे होते. मल्होत्रा हे भारतीय राजकारण आणि क्रीडा प्रशासनात त्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जात. त्यांनी दिल्ली प्रांतिक जनता संघाचे अध्यक्ष (१९७२-१९७५) आणि दोन वेळा दिल्ली भाजपचे अध्यक्ष (१९७७-१९८०, १९८०-१९८४) म्हणून काम पाहिले. त्यांच्या सक्रिय योगदानामुळे बीजेपी दिल्लीमध्ये भक्कमपणे उभी राहिली.

मल्होत्रा यांची सर्वात मोठी राजकीय कामगिरी म्हणजे १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करणे. गेल्या ४५ वर्षांत त्यांनी दिल्लीमधून ५ वेळा खासदार आणि २ वेळा आमदार म्हणून सेवा दिली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ते दिल्लीमधून भाजपाचे एकमेव विजयी उमेदवार होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी नेहमीच स्वच्छ प्रतिमा राखली आणि आदर मिळवणारे योगदान दिले.

मल्होत्रा हे केवळ राजकारणीच नव्हते, तर ते एक शिक्षणतज्ज्ञ (देखील होते. त्यांना हिंदी साहित्यात डॉक्टरेटची पदवी प्राप्त झाली होती. त्याशिवाय ते क्रीडा प्रशासनातही सक्रिय होते आणि दिल्लीतील बुद्धिबळ व धनुर्विद्या (तीरंदाजी) क्लबच्या व्यवस्थापनात सहभागी होते. राजकारण, शिक्षण आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांतील त्यांचे योगदान आजही स्मरणात राहील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande