नॅशनल क्रश गिरीजा ओक झाली ‘तू अनोळखी तरी सोबती’ची फॅन
मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। ''सन मराठी''वर नवीन मालिका ''तू अनोळखी तरी सोबती'' ही मालिका सुरु झाली आहे. मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी मालिकेचे प्रोमो प्रचंड व्हायरल झाले होते. प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ही कथा आहे. सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्
Mumbai


मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.)। 'सन मराठी'वर नवीन मालिका 'तू अनोळखी तरी सोबती' ही मालिका सुरु झाली आहे. मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी मालिकेचे प्रोमो प्रचंड व्हायरल झाले होते. प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ही कथा आहे. सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी या मालिकेचं कौतुक केलं आहे. अशातच सध्या ज्या मराठी अभिनेत्रीची जगभरात चर्चा सुरु आहे ती अभिनेत्री म्हणजे नॅशनल क्रश अभिनेत्री गिरीजा ओकने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गिरिजाने 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेचं कौतुक करत तिच्या आयुष्यातील किस्सा शेअर केला आहे.

‘तू अनोळखी तरी सोबती’चा पहिला भाग पाहताना गिरीजा ओकला तिच्या आणि नवऱ्याच्या प्रेमकथेच्या आठवणी जाग्या झाल्या असल्याचं तिने सांगितलं. कामातून सुरू झालेली ओळख मैत्रीत आणि पुढे लग्नात बदलली. मालिकेतील समीर व अर्पिता यांची गोष्ट पुढे कशी जाणार हे पाहण्यासाठी गिरीजाही उत्सुक आहे. या मालिकेचं आणि गिरीजाचं एक खास कनेक्शन म्हणजे गिरिजाच्या सासऱ्यांनी लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी मालिकेचं शीर्षक गीत लिहलं आहे. सध्या सर्वत्र या शीषर्क गीताची चर्चा सुरु आहे.

याचसह कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने ही तिच्या नवऱ्यासह मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता नेहमीच समाजकार्यचं आव्हान प्रेक्षकांना करायची. यामध्ये कुणाल नेहमी सामील व्हायचा. यानंतर दोघं एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटले. पुढे जाऊन कुणालने अंकिताला लग्नाची मागणी घातली. आणि त्यांचा अनोळखी प्रवास आयुष्यभरासाठी सुरु झाला. एकंदरीतच अनोळखी असणारी व्यक्ती पुढे जाऊन आयुष्यभराची सोबती कधी होऊन जाते कळतच नाही. मालिकेत अर्पिता व समीरचा अनोळखी ते सोबती पर्यंतचा प्रवास पाहणं रंजक ठरणार आहे. 'तू अनोळखी तरी सोबती' ही मालिका दररोज रात्री ९ वाजता 'सन मराठी'वर दर्शवली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande