समर स्वानंदीच्या मकरसंक्रांतीला आईचा गोंधळ
मुंबई, 10 जानेवारी, (हिं.स.)। गोव्यात झालेल्या धमाकेदार लग्नसोहळ्यानंतर, स्वानंदी- समर आणि अधिरा - रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे. पहिली संक्रांत म्हंटल कि उत्साह वेगळाच असतो. पण इथे अधिरा- रोहनच्या नात्यात मध्ये दुरावा आला आहे आणि जी अधिरा ने
समर स्वानंदीच्या मकरसंक्रांतीला आईचा गोंधळ


मुंबई, 10 जानेवारी, (हिं.स.)। गोव्यात झालेल्या धमाकेदार लग्नसोहळ्यानंतर, स्वानंदी- समर आणि अधिरा - रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे. पहिली संक्रांत म्हंटल कि उत्साह वेगळाच असतो. पण इथे अधिरा- रोहनच्या नात्यात मध्ये दुरावा आला आहे आणि जी अधिरा नेहमी सगळ्या गोष्टी करण्यात उत्साहीत असायची ती आपल्या लग्नानंतरचा पहिला सण साजरा करण्यासाठी उत्साही दिसत नाही, म्हणूनच समर- स्वानंदी ठरवतात कि अधिरा - रोहन मधला दुरावा या संक्रांतीला मिटवुया पण काकूला हे काही पटत नाहीये. तर दुसरीकडे अंशुमनने रोहनचा ऍक्सीडेन्ट करण्याची सुपारी दिलेय. घरात सगळे कार्यक्रमासाठी रोहनची वाट बघतायत. रोहन आला नाही म्हणून काकू तो येणारच नाही यावरून अर्पिता, अधिराला टोमणे मारते. पण तितक्यात स्वानंदी -रोहनला घेऊन येते. एका मोठ्या ऍक्सीडेन्ट मधून रोहन सुखरूप बाहेर पडून घरी येतो आणि संक्रांतीची पूजा पार पडते. पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या ऍक्सीडेन्ट विषय घेऊन गोंधळ घालते.

आईच्या या गोंधळामुळे अधिरा- रोहन सोबत समर-स्वानंदीच्या नात्यात ही गैरसमज वाढण्याची शक्यता दिसत आहे. लग्नाच्या पहिल्या सणातच असं घडतंय तर आता पुढे काय घडणार. यासाठी बघायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना' दररोज संध्या ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande