मविप्र मॅरेथॉन-२०२६’चा विजेता ठरला हरयाणाचा मनोज कुमार
नाशिक, 11 जानेवारी (हिं.स.)। : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार दि.११ जानेवारी रोजी पार पडलेल्या १० व्या राष्ट्रीय व १५ व्या राज्यस्तरीय ‘मविप्र मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेतील फूल मॅरेथॉनचे (४२.१९५ किमी) विजेतेपद हरयाणाच्या मनोज क
मविप्र मॅरेथॉन-२०२६’चा विजेता


मविप्र मॅरेथॉन-२०२६’चा विजेता


नाशिक, 11 जानेवारी (हिं.स.)।

: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार दि.११ जानेवारी रोजी पार पडलेल्या १० व्या राष्ट्रीय व १५ व्या राज्यस्तरीय ‘मविप्र मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेतील फूल मॅरेथॉनचे (४२.१९५ किमी) विजेतेपद हरयाणाच्या मनोज कुमार या सैन्य दलातील जवानाने पटकावले. तर हाफ मॅरेथॉनचे (२१ किमी) पहिले पारितोषिक नाशिक जिल्ह्यातील कमलाकर लक्ष्मण देशमुख याने पटकावले.

कडाक्‍याच्या थंडीत रविवारी (दि.११) पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल पाच हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२.१९५ किलोमीटर फूल मॅरेथॉनने स्पर्धेला सुरवात झाली. कुस्तीपटू तथा ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, रवींद्र देवरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव, ॲड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, विजय पगार, रमेश पिंगळे, शोभाताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

फूल मॅरेथॉनमध्ये धावताना मनोज कुमारने २ तास २० आणि २७ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपटूने २ तास २४ मिनिटे ४९ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखाचे तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगदेव हिरामण लाटे या धावपटूने २ तास २४ मिनिटे ५० सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा, तर सौरभ टोचे, हेमंत काळे यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचलन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी आभार मानले. क्रीडा संचालक मिनाक्षी गवळी, हेमंत पाटील, अनिल उगले, कल्पना नाईकवाडी, कैलास लवांड, प्रा. महेश कारे, डॉ. मंगल शिंदे यांनी विजेत्यांच्या यादीचे वाचन केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. विलास देशमुख, प्रा. दौलत जाधव, डॉ. के. एस. शिंदे, डॉ. अजित मोरे, शशिकांत मोगल, प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे यांच्यासह आयोजन समितीच्या डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील, प्रा. डॉ. सुनील धोंडगे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गडाख, प्रा. हेमंत काळे, मंगल शिंदे, डॉ.नामदेव काकड, प्रा. पूनम महाजन, कल्पना कानवडे, सुरेश कुंभार्डे आदी क्रीडाशिक्षकांसह शाखाप्रमुख, सेवक यांनी परिश्रम घेतले.

*गटनिहाय प्रथम तीन विजेते*१) फुल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) : मनोज कुमार (प्रथम, पानिपत, हरयाणा), सिकंदर चिंधू तडाखे (द्वितीय, नाशिक महाराष्ट्र), चांगदेव हिरामण लाटे (तृतीय, अहिल्यानगर, महाराष्ट्र)

२) हाफ मॅरेथॉन (२१ किमी) : कमलाकर लक्ष्मण देशमुख (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), राज राधेश्याम तिवारी (द्वितीय, मुंबई), रोहित वर्मा (तृतीय, रेवारी, हरयाणा)

३) महिला खुला वर्ग (१० किमी) : साक्षी अनंत कसबे (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), प्रियंका लालसू ओक्सा (द्वितीय, नाशिक, महाराष्ट्र), रिंकी धन्या पावरा (तृतीय, नंदुरबार)

४) पुरुष खुला गट (१० किमी) : सौरभ सौरभ सौरभ (प्रथम, हरयाणा), कृपाशंकर लालमनी कुमार (द्वितीय, नाशिक), अतुल शांताराम बर्डे (तृतीय, नाशिक)

५) २५ वर्षाआतील मुले (१२ किमी) : कार्तिककुमार चाम्रुजी कारीहारपाल – (प्रथम, नाशिक), दिलीप जनार्दन महाले (द्वितीय, नाशिक), रूपसिंग जन्या वसावे (तृतीय, नंदुरबार)

६) १९ वर्षाआतील मुले (१० किमी) : गोविंद प्रकाश पाडेकर (प्रथम, नाशिक), सुरज जयराम माशी (द्वितीय, नाशिक), अनिल संजय जाधव (तृतीय, नाशिक)

७) १९ वर्षाआतील मुली (५ किमी) : पौर्णिमा बळवंत भोये (प्रथम, त्र्यंबकेश्वर, नाशिक), वंदना पंडित तुंबडे (द्वितीय, त्र्यंबकेश्वर, नाशिक), तेजस्विनी यशवंत भोये (तृतीय, नाशिक),

८) १७ वर्षाआतील मुले (५ किमी) : हर्ष प्रमोद पाटील (प्रथम, छत्रपती संभाजीनगर), साहिल प्रकाश पवार (द्वितीय, दिंडोरी, नाशिक), आकाश रामेश्वर राठोड (तृतीय, जालना)

९) १७ वर्षाआतील मुली (४ किमी) : लावण्या सुभाष नगरकर (प्रथम, चंद्रपूर), वैष्णवी संदीप आहेर (द्वितीय, नाशिक), रुचिका सुनील नगरकर (तृतीय, चंदपूर)

१०) १४ वर्षाआतील मुले (४ किमी) : प्रतिक प्रवीण जवळे (प्रथम, नाशिक), तेजस त्र्यंबक मोंढे (द्वितीय, अंजनेरी, नाशिक), आदित्य दिनेश पाटील (तृतीय, नाशिक)

११)१४ वर्षाआतील मुली (३ किमी ) : गौरी मनोज चौधरी (प्रथम, नाशिक), दिव्या विजय यादव (द्वितीय, नाशिक), कल्याणी बळवंत भोये ( तृतीय, नाशिक)

१२) २५ वर्षाआतील मुली (६ किमी) : ताई हिरामण बामणे (प्रथम, नाशिक), पूजा प्रभाकर पारधी (द्वितीय, नाशिक), मोनिका जगन निल्पुंगे (तृतीय, नाशिक)

१३) ६० वर्षावरील पुरुष (६ किमी) : रवींद्र सूर्यभान पाटील (प्रथम, जळगाव), वसंत कचरू आहेर (द्वितीय, नाशिक), सूर्यकांत दामोदर भोसले (तृतीय, नाशिक)

१४) ३५ वर्षावरील महिला (६ किमी) : निवृत्ती दत्ता बोरसे (प्रथम, जव्हार), प्रीती राजेंद्र वाघ (द्वितीय, नाशिक), शीतल राहुल संघवी (तृतीय, नाशिक)

१५) २ किमी – ओपन फन रन (ही स्पर्धा आरोग्य व सामाजिक विषयांवर होती)

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande