श्रीवर्धन–म्हसळा तालुकास्तरीय कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेत ग्रामीण महिलांचा विजय
रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। ग्रामीण भागातील महिलांना क्रीडेमार्फत आत्मविश्वास, नेतृत्व आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारी श्रीवर्धन–म्हसळा तालुकास्तरीय भव्य महिला कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा सिद्धार्थ बोरकर मित्र मंडळ, श्रीवर्धन दांडा यांच्या वतीने उत्
क्रीडेतून आत्मविश्वास; ग्रामीण महिलांचा विजय


रायगड, 12 जानेवारी (हिं.स.)। ग्रामीण भागातील महिलांना क्रीडेमार्फत आत्मविश्वास, नेतृत्व आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारी श्रीवर्धन–म्हसळा तालुकास्तरीय भव्य महिला कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा सिद्धार्थ बोरकर मित्र मंडळ, श्रीवर्धन दांडा यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

श्री सोमजाई मंदिर क्रीडा नगरी, श्रीवर्धन येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मधुकरजी ढवळे यांच्या हस्ते झाले.साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या सामन्यांमध्ये महिला खेळाडूंनी आपली ताकद, चपळाई, रणनीती आणि सांघिक खेळाचे प्रभावी दर्शन घडविले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी महिला प्रेक्षकांसह मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी उपस्थित होते.

अंतिम फेरीत सुवर्ण गणेश, दिवेआगर संघाने विजेतेपद पटकावले. शिवकन्या, पाली संघ उपविजेता ठरला, तर जय श्रीराम, तुरुंबाडी संघाने तृतीय आणि जय बजरंग, मेंदडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. अलिबाग, रोहा, मुरुड, पाली, म्हसळा आदी भागांतील संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान दिवेआगर संघाच्या अदिती पानवळकर हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर पटकावला. सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘जय गणेश लाईव्ह’द्वारे करण्यात आले. सूत्रसंचालन वीरेंद्र वाणी यांनी केले. यावेळी श्रीवर्धन नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍड. अतुल चोगले, नगरसेवक प्रविता माने, सलोनी मोहित, अनंत गुरव, संतोष वेश्विकर (पिंट्या), प्रसाद विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सबा फिरफिरे तसेच शिवसेना युवा तालुका अध्यक्ष अजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची शोभा अधिकच वाढली.

या स्पर्धेत एकूण आठ महिला संघांनी सहभाग घेतला होता. महिला खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देणारी ही स्पर्धा ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण निर्माण करणारी ठरली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande