विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकची मुंबईवर मात तर सौराष्ट्रचा उत्तर प्रदेशवर विजय
बंगळुरु, 12 जानेवारी (हिं.स.)विजय हजारे ट्रॉफीच्या सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये कर्नाटक आणि सौराष्ट्रने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात कर्नाटकने मुंबईला प
हार्विक देसाई आणि देवदत्त पडिकल


बंगळुरु, 12 जानेवारी (हिं.स.)विजय हजारे ट्रॉफीच्या सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये कर्नाटक आणि सौराष्ट्रने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात कर्नाटकने मुंबईला पराभूत केले, तर सौराष्ट्राने उत्तर प्रदेशला एका चुरशीच्या लढतीत मात दिली. उर्वरित दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने मंगळवारी खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये पंजाबचा मुकाबला मध्य प्रदेशशी होणार आहे. तर दिल्ली आणि विदर्भ एकमेकांसमोर येतील.

देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर यांच्या शानदार खेळीमुळे गतविजेत्या कर्नाटकने मुंबईला ५५ धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पावसामुळे व्हीजेडी पद्धतीचा वापर करून निकाल जाहीर करण्यात आला. २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, खेळ थांबवण्यात आला तेव्हा कर्नाटकने ३३ षटकांत एक बाद १८७ धावा केल्या होत्या. त्यावेळी व्हीजेडीचा स्कोअर १३२ होता, तर कर्नाटक ५५ धावांनी आघाडीवर होता. पडिक्कल ८१ आणि नायर ७४ धावांवर नाबाद राहिले. त्याआधी, शम्स मुलानीने ८६ धावांची झुंज दिली आणि मुंबईला फक्त २५४/८ धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्नाटककडून विद्याधर पाटीलने तीन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्णधार हार्विक देसाईच्या नाबाद शतकाच्या जोरावर सौराष्ट्रने उत्तर प्रदेशचा १७ धावांनी पराभव करून अंतिम चार संघात स्थान निश्चित केले. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात व्हीजेडी पद्धत देखील लागू करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना, उत्तर प्रदेशने अभिषेक गोस्वामी आणि समीर रिझवी यांनी प्रत्येकी ८८ धावा करून ३१०/८ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, खेळ थांबला तेव्हा सौराष्ट्राने ४०.१ षटकांत ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. देसाई १०० धावांवर नाबाद राहिले आणि प्रेरेक मंकड (६७) आणि चिराग जानी (नाबाद ४०) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या, ज्यामुळे सौराष्ट्राचा विजय झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande