
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ व प्रेक्षकांचे लाडके *अभिनेते लोकेश गुप्ते* तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झालेआहेत. झी मराठीवरील ' *शुभ श्रावणी'* या मालिकेत ते *शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के* ची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना लोकेश यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे विश्वंभर राजशिर्के आहे, जो एक शिक्षणमंत्री आहे. त्याचं आणि त्याची मुलगी श्रावणी या दोघांच्या नात्याभोवती ही गोष्ट फिरते. विश्वंभरच्या भूतकाळातल्या काही कटू आठवणी आणि घटना आहेत आणि त्या गोष्टीचा प्रभाव विश्वंभरवरती एवढा आहे की तो स्वतःच्या मुलीच तोंड देखील बघत नाही. पण त्यांनी तिला वाढवण्यात, तिच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही गोष्टीत काही कमी नाही केली. विश्वंभरचा घरामध्ये आणि शहरामध्ये खूप दबदबा आहे कारण जे एम्पायर त्यांनी उभं केले आहे ते स्वतःच्या कष्टाने उभ केलेल आहे. विश्वंभरच जे काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे आणि जे काही काम केले आहे ते लोकांच्या हितासाठी केल आहे. तो शिस्तप्रिय, कडक आणि लोकांची मदत करणारा आहे. घरात श्रावणीला सोडून इतर सदस्यांशी त्याच छान नातं आहे. जेव्हा 'शुभ श्रावणी' साठी कॉल आला तेव्हा मनात काय विचार चालू होते या बद्दल लोकेश म्हणाले, मी मधल्या काळामध्ये लेखन आणि दिग्दर्शनात व्यस्त होतो. विश्वंभरच्या भूमिकेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला खुप आनंद झाला कारण एक तर मी ९ वर्षानंतर टेलिव्हिजन करणार ह्याचा उत्साह होता, आणि एक छान व्यक्तीरेखा चालून आली आहे ज्यात मुलगी आणि वडील ह्यांच्या नात्याची एक वेगेळी गोष्ट आहे. मी स्वतः एका मुलीचा वडील असल्यामुळे मला ही गोष्ट खूप भावली म्हणून या भूमिकेसाठी मी होकार दिला.
माझी भूमिका चॅलेंजिंग आणि खूप वेगळी आहे, ज्यात मला बऱ्याच वेगवेगळ्या इमोशनस साकारायची संधी मिळणार आहे. समाजात विश्वंभर हा एक नामांकित आणि समाज हितासाठीची काम करणारा व्यक्ती आहे. ह्या मालिकेत, घरात धाकटा भाऊ आहे, वहिनी आहे, मोठी बहीण आहे तिची मुलगी आहे, मुलगा आहे... असे बरेच नातेसंबंध आहेत ज्यांच्याशी विश्वंभरच खूप छान असं नातं आहे पण तिथेच त्याच त्याच्या मुलीशी अगदीच उलट विपरीत असं अबोल कठोर असे संबंध आहेत.
भूमिकेच्या तयारीबद्दल सांगायचे झाले तर निर्माते संदीप सिकंद, मालिकेचे दिग्दर्शक,लेखक आणि चॅनेल यांच्याकडून जी भूमिकेबद्दलची माहिती मिळाली ती माहिती मी सध्या गोळा करण्याच्या प्रयत्न करत आहे. विश्वंभरचा घरातला आणि बाहेरचा वावर, त्याची बॉडी लँग्वेजवर काम करत आहे. मी या आधी ज्या भूमिका केल्या त्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा माझी हि भूमिका नक्कीच लोकांना आवडेल, कारण माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा खूप काही चांगलं... वेगळं...ह्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या व्यक्तीरेखेसाठी मी माझं पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रेक्षकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. मला स्वतः ह्या गोष्टीचा आनंद होता कारण खूप वर्षांनी मी टेलिव्हिजन करत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा बघून खूप बर वाटलं आणि खूप आनंद झाला. कंमेंट बद्दल सांगायचं तर मालिका कधी सुरु होणार आहे, यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, हे वाचून खूप छान वाटलंच. पण माझ्या लक्षात राहणारी कंमेंट म्हणजे मला बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर टीव्हीवर बघायला, माझी भूमिका बघायला अजूनही प्रेक्षक उत्सुक आहेत, हे प्रेम बघून मस्त वाटलं. आमच्या शुभ श्रावणीच्या प्रोमोला जो प्रतिसाद मिळाला तो पाहून पण मी खूपच खुश झालो असच प्रेम कायम राहो.
आमच्या शूटिंगच्या सेट वर भरपूर धमाल आणि पॉजीटीव्ह एनर्जी बघायला मिळते. प्रॉडक्शन, आमचे डायरेक्टर असोत किंवा आम्ही सहकलाकार असोत या बद्दल बोलायचं झालं तर सगळं एकदम उत्तम आहे. आसावरी सोबत मी पूर्वी हि काम केलेलं आहे, पण बाकी सगळे नवीन कलाकार हि खूप छान आहेत. पहिल्याच दिवसापासून छान सहयोग, एकोपा, धमाल सेटवर मला बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे मला काम करताना जे सकारात्मक वातावरण लागत ते आमच्याकडे भयंकर आहे. सहकालाकांसोबत टीम म्हणून काम करताना मला तर खूपच छान उर्जावानआणि धमाल मज्जा वाटते. सध्या आम्ही सर्वच एकमेकांशी ओळखी वाढवतोय, व्यक्तीरेखेबद्दल चर्चा करतोय. आम्ही प्रत्येकजण स्वतःची व्यक्तीरेखा उत्तम साकारण्याच्या प्रयत्नात आहेत, प्रत्येकजण मेहनत घेतोय.
*बघायला विसरू नका 'शुभ श्रावणी' दररोज संध्या ७: ०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर