रुग्णालयात पोहोचेपर्यंत दुखापत किती गंभीर आहे हे कळले नव्हते -श्रेयस अय्यर
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला झालेल्य दुखापतीची तीव्रता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली,
श्रेयस अय्यर


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला झालेल्य दुखापतीची तीव्रता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली, तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली. अय्यरने त्रास अत्यंत वेदनादायक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, त्यावेळी त्याला प्लीह हा एक महत्त्वाचा अवयव आहे हे देखील माहित नव्हते.

श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावर जोरदार पुनरागमन केले. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ४९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी बोलताना तो म्हणाला, दुखापत अत्यंत वेदनादायक होती. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत मला दुखापत किती गंभीर आहे हे कळले नव्हते. त्याच दिवशी मला कळले की प्लीह हा एक महत्त्वाचा अवयव आहे. मी त्या दिवशी तो शब्द शिकलो.

अय्यरने स्पष्ट केले की, दुखापतीमुळे त्याला थांबून स्वतःवर चिंतन करण्याची संधी मिळाली. तो म्हणाला, मी एक असा माणूस आहे जो शांत बसू शकत नाही, पण या दुखापतीने मला स्वतःला वेळ देणे किती महत्त्वाचे आहे हे शिकवले. तुम्ही फक्त उठून सराव सुरू करू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की मी सहा ते आठ आठवड्यांत सामान्य होईन आणि मी मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन केले.

अय्यर म्हणाला की, त्याची फंलदाजीतील आक्रमकता कोणत्याही योजनेचा भाग नाही, तर ती पूर्णपणे सहजप्रवृत्ती आहे. तो पुढे म्हणाला, मी सामन्यात काही विशेष करण्याचा प्रयत्न करत नाही. जर चेंडू माझ्या क्षेत्रात असेल तर मी तो खेळतो. मला त्या क्षणात जगायला आवडते. गेल्या सामन्यात, मी एकेरी घेण्याबद्दल खूप विचार करत होतो, ज्यामुळे माझ्या शरीराची प्रतिक्रिया थोडी मंदावली. मला पुन्हा ते करायचे नाही.

विराट कोहलीशी झालेल्या संभाषणाबद्दल, अय्यर म्हणाला की, ते दोघेही वर्तमानात राहण्यावर आणि संघासाठी एक मजबूत धावसंख्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करतात. तो म्हणाला, आम्ही विनोदी पद्धतीने बोलतो आणि गोलंदाजांविरुद्ध कसे खेळायचे हे ठरवतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, ३०० धावांचा पाठलाग करणे देखील सोपे आहे, म्हणून गोलंदाजांना आत्मविश्वास देणारा धावसंख्या उभारणे महत्त्वाचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande