न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना 7 विकेट्सने जिंकला; केएल राहुलची शतकी खेळी व्यर्थ
राजकोट, 14 जानेवारी (हिं.स.)भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथे खेळला गेला. न्यूझीलंडने १५ चेंडू शिल्लक असताना सात विकेट्सने विजय मिळवला. सामन्याचा हिरो अनुभवी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज डॅरिल म
के एल राहुल


राजकोट, 14 जानेवारी (हिं.स.)भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथे खेळला गेला. न्यूझीलंडने १५ चेंडू शिल्लक असताना सात विकेट्सने विजय मिळवला. सामन्याचा हिरो अनुभवी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज डॅरिल मिशेल होता. त्याने ११७ चेंडूत १११.९६ च्या स्ट्राईक रेटने १३१ धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विल यंगनेही ९८ चेंडूत ८७ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. शेवटचा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ आता मालिका जिंकेल.

केएल राहुलच्या नाबाद शतकामुळे भारताने न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केएल राहुलने ९२ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११२ धावा केल्या. ज्यामुळे भारताने ५० षटकांत 7 बाद २८४ धावा करता आल्या होत्या. राहुल व्यतिरिक्त भारताकडून शुभमन गिलने ५६ धावा केल्या, तर इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत.

भारताकडून राहुल आणि गिल व्यतिरिक्त रवींद्र जडेजा २७, रोहित शर्मा २४, विराट कोहली २३, नितीश कुमार रेड्डी २०, श्रेयस अय्यर ८ आणि हर्षित राणाने दोन धावा केल्या. मोहम्मद सिराज दोन धावा काढून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून ख्रिस क्लार्कने तीन विकेट्स घेतल्या, तर काइल जेमीसन, झाचेरी फॉक्स, जेडेन लिनॉक्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande