थायलंडमध्ये आणखी एक क्रेन अपघात
बँकॉक, 15 जानेवारी (हिं.स.) थायलंडमध्ये एका दिवसापूर्वीच झालेल्या भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला होता. आता राजधानी बँकॉकमध्येही क्रेन कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमी आणि मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. थायलंडमधील स्थ
थायलंडमध्ये आणखी एक क्रेन अपघात


बँकॉक, 15 जानेवारी (हिं.स.) थायलंडमध्ये एका दिवसापूर्वीच झालेल्या भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला होता. आता राजधानी बँकॉकमध्येही क्रेन कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमी आणि मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. थायलंडमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी घडलेला नवा अपघात बँकॉकच्या बाहेरील भागात झाला असून, तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामावर क्रेन कोसळली आणि अनेक जण त्याच्या मार्गात आले. अग्निशमन आणि आपत्कालीन मदत विभागाने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांचा आकडा दोनपर्यंत पोहोचला आहे. अद्याप अधिकृतपणे मृतांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. क्रेन कोसळल्यामुळे दोन वाहनेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, तो रामा-2 महामार्गाच्या विस्ताराचा भाग आहे. या रस्त्याच्या बांधकामादरम्यान यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत.

बुधवारी नाखोन रतचासिमा प्रांतात झालेल्या रेल्वे अपघातातील बचावकार्य पूर्ण झाले आहे. राज्यपालांनी सांगितले की, तीन प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे ते अपघातापूर्वीच ट्रेनमधून उतरले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपास अद्याप सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या ट्रेनमध्ये 171 प्रवासी प्रवास करत होते. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून सांगितले आहे की, रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक दक्षिण कोरियाचा नागरिक होता.

ज्या रेल्वे प्रकल्पावर क्रेन कोसळण्याची घटना घडली, तो थायलंड सरकारचा अब्जावधी डॉलरचा प्रकल्प असून, चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ योजनेचा भाग आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना आग्नेय आशियाला चीनशी जोडण्याचा उद्देश ठेवते. यापूर्वी ऑगस्ट 2024 मध्येही याच मार्गावर रेल्वे बोगद्याच्या बांधकामादरम्यान अपघात झाला होता, ज्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande