अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
वॉशिंग्टन , 16 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील ओरेगॉन राज्याच्या तटीय भागात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवली गेली. मात्र, सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही. जर्मन रिसर्च सें
अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप


वॉशिंग्टन , 16 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील ओरेगॉन राज्याच्या तटीय भागात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवली गेली. मात्र, सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार,या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. नॅशनल सुनामी वॉर्निंग सेंटरकडून अद्याप सुनामीबाबत कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.ओरेगॉनच्या ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले, तो भाग ओरेगॉन आणि कॅलिफोर्निया यांच्या सीमेवर स्थित आहे. या परिसरात वारंवार भूकंप होतात. येथील बहुतांश भूकंप जमिनीच्या आत खोलवर होतात आणि अनेकदा ते पृष्ठभागावर जाणवतही नाहीत.

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही ओरेगॉनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हा भाग कॅस्केडिया झोनचा एक हिस्सा आहे. कॅस्केडिया झोन उत्तर वॅंकूव्हर बेटापासून ते उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेला असून, तो पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली भूकंप क्षेत्रांपैकी एक मानला जातो.सन 1700 मध्ये येथे 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामुळे भीषण सुनामी आली होती. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, भविष्यात जर पुन्हा इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला आणि सुनामी आली, तर तटीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande