जळगावात चुलत भावाच्या अत्याचारातून १३ वर्षीय पीडिता गर्भवती
जळगाव , 15 जानेवारी (हिं.स.) भडगाव तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. २२ वर्षीय तरुणाने त्याच्या १३ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या कृत्यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यक
जळगावात चुलत भावाच्या अत्याचारातून १३ वर्षीय पीडिता गर्भवती


जळगाव , 15 जानेवारी (हिं.स.) भडगाव तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. २२ वर्षीय तरुणाने त्याच्या १३ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या कृत्यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नराधम चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडगावमधील एका गावात राहणाऱ्या नराधम तरुणाने नात्याचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत आपल्या सख्ख्या चुलत बहिणीवर सातत्याने अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपासून मुलीच्या प्रकृतीत बिधाड जाणवू लागल्याने तिला तातडीने भडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न होताच कुटूंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावाविरोधात बलात्काराचे गंभीर कलम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande