
बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। द्रुतगती लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गाचा आराखडा बदलून तो लातूर-औसा-धाराशिव-वड वर्णी-बीड-अहिल्यानगर-क ल्याण या मार्गाने घ्यावा, अशी ठाम मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर यांनी केली आहे. संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक ८ एकमताने मंजूर करण्यात आला.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लातूर ते मुंबई हे अंतर १० ते १२ तासांवरून ४ ते ५ तासांत पूर्ण करण्यासाठी लातूर-कल्याण जनकल्याण द्रुतगती महामार्ग प्रकल्प जाहीर करण्यात आला. सध्या प्रस्तावित मार्ग लातूर-अंबाजोगाई-केज-बीड-जामखेड-अहिल्यानगर-कल्याण असा आहे. बाजार समितीच्या मते, हा महामार्ग लातूर-औसा-धाराशिव- वड वणी-बीड-अहिल्यानगर-कल्याण असा मार्ग आहे.
बीड जिल्ह्यासह परिसरातील जनतेच्या कल्याणाला चालना मिळेल. बीड जिल्हा कृषीप्रधान आहे. शेतकरी व कृषीपूरक व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पादन मुंबई-पुणे महानगरात लवकर पोहोचेल. बाजारपेठ वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संदीप मधुकरराव शिंगणारे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याची मागणी केली. सभेत हे निवेदन वाचण्यात आले. सर्व संचालकांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला. महामार्गाचा आराखडा शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असावा. कमी अंतराचा व अधिक फायदेशीर मार्ग स्वीकारावा, अशी विनंती मुख्यमंत्री यांना करावी, असा ठराव सभेत मंजूर झाला. ठरावास सूचक संदीप मधुकरराव शिंगणारे तर अनुमोदक उपसभापती सुनील लक्ष्मण शिंगणारे होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis