परभणी पालिकेंतर्गत रात्री उशीरापर्यंत काही केंद्रांवर मतदान
परभणी, 15 जानेवारी (हिं.स.)। महापालिकेंतर्गत काही केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेच्या आतच मतदारांच्या अचानक रांगा लागल्या. या प्रकाराने केंद्राध्यक्षांसह प्रतिनिधी बावचळून गेले. लगेचच सावरत या प्रतिनिधींनी 5 वाजता या सार्‍या मतदारांना आत
परभणी पालिकेंतर्गत काही केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत काही केंद्रांवर मतदान


परभणी, 15 जानेवारी (हिं.स.)।

महापालिकेंतर्गत काही केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेच्या आतच मतदारांच्या अचानक रांगा लागल्या. या प्रकाराने केंद्राध्यक्षांसह प्रतिनिधी बावचळून गेले. लगेचच सावरत या प्रतिनिधींनी 5 वाजता या सार्‍या मतदारांना आत घेवून केंद्राचे दरवाजे बंद केले व रांगेने एक एक करीत मतदानाची प्रक्रिया सुरु ठेवली. प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत खानापूर परिसरातील आनंद विद्यालयाच्या केंद्रावर 7.30 वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तर शिवाजी महाविद्यालयांतर्गत केंद्रांवरसुध्दा सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरु होते. अन्यत्रही बर्‍यापैकी रांगा लागलेल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande