
अमरावती, 15 जानेवारी, (हिं.स.) चांदूर बाजार शहरातील अखेर धर्म परिवर्तन प्रकरणात ४ जणांविरुद्ध चांदुर बाजार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील अमोल वानखडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी एका महिलेसह जोसेफ विश्वासराव खुदावन,विक्टर जोसेफ खुदावन व आरोपी अनंत बाबुलाल खुदावन या चार जणांविरोधात चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन संस्थाच्या नावावर संडे स्कुलच्या माध्यमातून रविवार वारच्या दिवशी चांदूर बाजार शहरातील उदय कॉलनी परिसरात आरोपीकडून चिमुकल्यांना खाऊ चे आमिष दाखवत ख्रिश्ती धर्म परिवर्तन करण्याचा पाठ पडवला जातो. फिर्यादी अमोल वानखडे या संस्थे मध्ये १० वर्षा पासून कार्यरत असल्याच बोलले जात आहे. तर धर्म परिवर्तन करण्यासाठी अमोलला व त्याच्या पत्नीला नोकरीवर लावून देऊ मालकी हक्काचे घर देऊ व मुलांच्या शिक्षणा चा खर्च देऊ असे आमिष दिल्याचा आरोप फिर्यादी अमोल वानखडे यांनी केला. त्यानंतर दबाव टाकून दिनांक १९ एप्रिल २०१४ रोजी ख्रिश्ती धर्मातिल बाप्तीस्मा ही विधि करून अमोल व त्याच्या पत्नीला प्रमाणत्र देण्यात आले सदर प्रमाणपत्रावर आरोपी जोसेफ विश्वासराव खुदावंत यांची स्वाक्षरी असल्याचा दावा फिर्यादी अमोल ने केला आहे अमोल ने सदर प्रमाणपत्र स्वीकारलं असता त्यांच्या दस्ताऐवजावर कोणताही ख्रिश्ती धर्माचा उल्लेख न केल्याच तक्रार मध्ये नमूद केले आहे तर दिनांक १ सप्टेंबर २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दस्ताएवजात ख्रिश्ती धर्माची नोंद करा असा दबाव वारंवारावर आरोपींकडून फिर्यादी अमोलवर टाकण्यात आला. तर अमोल वानखडे याने चांदूर बाजार पोलिसात धाव घेत या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाची चौकशी करून आरोपीचे मत घेण्यात आले. २० दिवसानंतर दिनांक १४ जानेवारी रोजी चांदूर बाजार पोलिसांनी धर्म परिवर्तन प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये आरोपींवर कलम २९९,३०२,३(५) ही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. अमोलच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता फिर्यादी अमोल वानखडे करीत आहे व इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन या संस्थेची नोंद रद्द करण्याची मागणी देखील अमोल ने यावेळी केली आहे.
संडे स्कुल( धर्मांतराची शाळा थांबवा),येवडा पैसा येतो कुठून?
चांदुर बाजार शहरातील उदय कॉलनी परिसरात रविवारच्या दिवशी धर्मांतराची शाळा चालते. त्यामध्ये चिमुकल्यांना खाऊ चे आमिष दाखवत ख्रिश्ती धर्माचा पाठ पडवला जातो. तर धर्मांतर करण्यासाठी विदेशातून कोटी रुपये येत असल्याच बोलले जात आहे. रविवार च्या दिवशी सुरु असलेली धर्मांतराची शाळा थांबवा व विदेशातून येणारा पैसा येतो कसा याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
संस्थाची नोंद रद्द करा, आरोपींवर अॅट्रॉसिटी कायदा दाखल करा!
इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन या ख्रिश्ती संस्थेच्या माध्यमातून समाजिक उपक्रम न राबवता आमिष दाखवत धर्मांतरचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे ही संस्था रद्द करण्याची मागणी देखील अमोलने केली आहे व धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणात आता अॅट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी अमोल वानखडे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी