बीड, धारूरला हलका पाऊस; आठवडाभरात थंडी वाढणार
बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, कमी झालेली थंडी पुन्हा वाढणार आहे. आठवडाभरात तापमान पुन्हा १२ अंशाखाली जाणार अ
बीड, धारूरला हलका पाऊस; आठवडाभरात थंडी वाढणार


बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, कमी झालेली थंडी पुन्हा वाढणार आहे. आठवडाभरात तापमान पुन्हा १२ अंशाखाली जाणार असून, थंडीचा कडाका वाढणार आहे. धारुर, बीड तालुक्यांसह इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

मकरसंक्रांतीपासून ढगाळ वातावरण निवळेल. त्यानंतर उत्तर भारतातून थंड वारे येणार आहेत. १८ जानेवारीदरम्यान थंडीची लाट येईल. रात्रीच्या वेळी हुडहुडी वाढेल. १६ आणि १७ जानेवारीला आकाश निरभ्र राहील. हवामान कोरडे राहील. १८ जानेवारीला थंडीचा प्रभाव कायम राहील. या बदलत्या हवामानामुळे शेती कामांना वेग येईल. मात्र, तापमान घटल्याने हरभरा आणि गहू या रब्बी पिकांवर दव पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धारूर शहर व परिसरात अचानक हलका पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली कडाक्याची थंडी कमी झाली. वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काहीसा फायदेशीर ठरू शकतो. रब्बी पिकांना थोडी ओल मिळाली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande